शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेत शंभर कोटींच्या निधीचे प्रस्ताव लवकरच अंतिम टप्प्यात : संगीता खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:45 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर कोटींच्या निधीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

ठळक मुद्देसांगली महापालिकेचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात येणारसांगली शहरासाठी ६०, तर मिरज शहरासाठी ४० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर कोटींच्या निधीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविले जाणार असल्याची माहिती महापौर संगीता खोत यांनी सोमवारी दिली. 

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान योजनेतून शंभर कोटींचा निधी महापालिकेला जाहीर केला होता. राज्य शासनाकडून सत्तर टक्के निधी येणार असून, तीस टक्के निधी महापालिकेला आपला हिस्सा म्हणून घालावा लागणार आहे. या योजनेतून कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने आयुक्तांना दिले होते. त्यानुसार सत्ताधारी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील, गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक शेखर इनामदार आदी पदाधिकाºयांनी एकत्रित बसून कामांचे प्रस्ताव तयार केले आहेत. या कामांचे आराखडे तज्ज्ञांमार्फत तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

सांगली शहरासाठी ६०, तर मिरज शहरासाठी ४० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या प्रस्तावांमध्ये भावे नाट्यमंदिरजवळील महापालिकेच्या जागेत शॉपिंग आॅफिसेस व बहुमजली पार्किंगची इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच शिवाजी मंडई पार्किंगसह विकसित करणे, खणभाग येथील मटण मार्केट विकसित करणे, पेठभाग भाजी मंडई विकसित करणे, जुने गोकुळ नाट्यगृह जागेत भाजी मंडई विकसित करण्याबरोबरच सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण विकसित करणे व दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. कुपवाड येथे अद्ययावत भाजी व फळ मार्केट विकसित करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. याबरोबरच मिरज किल्लाभाग खंदक जागेत भाजी व फळ मार्केट विकसित करणे, लक्ष्मी मार्केट, मिरज बालगंधर्व नाट्यगृहाचे नूतनीकरण करणे, ठाणेकर मळा जागेत भाजी आणि फळ मार्केट विकसित करणे, मिरज- पंढरपूर रस्त्यावर वारकरी भवन बांधणे आदी कामांचा यामध्ये समावेश केला आहे. 

या कामांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आले आहेत. येत्या काही दिवसात या प्रस्तावांना महापालिकेची मंजुरी घेऊन अंतिम मान्यतेसाठी ते शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर कामांच्या निविदा प्रक्रिया राबविल्या जातील, अशी माहिती महापौर खोत यांनी दिली.  

महापालिकेवर कोणताही बोजा नको!मुख्यमंत्र्यांनी नगरोत्थान योजनेतून शंभर कोटींचा निधी जाहीर केला आहे. मात्र महापालिकेला शासनाकडून केवळ सत्तर कोटी मिळणार आहे. उर्वरित तीस कोटींचा निधीचा स्वहिस्सा योजनांमध्ये महापालिकेला घालावा लागणार आहे. शासनाने शंभर टक्के निधी द्यावा, तीस कोटींचा बोजा महापालिकेवर नको, अशी मागणी महापौर संगीता खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका